Homeपुणेनिष्ठावंत हटके भक्तांमुळे गीतरामायणाला महाग्रंथासारखे पावित्र्य लाभले

निष्ठावंत हटके भक्तांमुळे गीतरामायणाला महाग्रंथासारखे पावित्र्य लाभले

Newsworldmarathi Pune : मराठी माणसाच्या काळजातील एक खास कप्पा ‘गीतरामायण’ने व्यापलेला आहे. वेगवेगळ्या व्यवसायांत कार्यरत असलेली अनेक मंडळी या हटके म्युझिकल ग्रुप द्वारे, आपापल्या मार्गाने या अजरामर काव्याचा प्रसार करण्यासाठी एकत्र येतात,हीएक विलक्षण बाब आहे. ‘गीत रामायण’चा आदरभाव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी हटके म्युझिक या ग्रुप सातत्याने प्रयत्नशील आहेत. या काव्यरचनेला जे महाग्रंथासारखे पावित्र्य लाभले आहे,त्यामागचेखरे कारण म्हणजे अश्या प्रकारच्या निष्ठावंत हटके भक्तांचे अविरत कार्य आणिसमर्पणभाव, अशी भावना लेखक आनंद माडगूळकर यांनी व्यक्त केली.

हटके म्युझिक ग्रुप यांची गीतरामायण सादरीकरणाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये जागतिक विक्रमम्हणून नोंद झाली आहे. यानिमित्त हटके गीत रामायण विश्वविक्रम सोहळा कार्यक्रमाचेआयोजन टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉलमध्ये करण्यात आले होते.यावेळी हटके म्युझिक ग्रुपचे संचालक शिरीष कुलकर्णी, जेष्ठ व्यावसायिक पुष्कराज ग्रुप चे सर्वेसर्वा शैलेन्द्र गोस्वामी, फ्लुइड कंट्रोल्स चे संचालक तानसेन चौधरी आणि श्रेष्ठ गायक आणि हार्मोनिअम वादक अनिल मोटे आदी उपस्थित होते.

यावेळी गीतरामायणातील निवडक गीते सादर करण्यात आली. हटके म्युझिक ग्रुप या विश्वविक्रमाचे सर्व श्रेय – ज्यांनी गीत रामयणाचे लेखन केले ते आधुनिक वाल्मिकी गदिमा आणि ज्यांनी संगीत दिले ते सांगीतिक दिग्गज बाबुजी यांना दिले आणि ते वंशा प्रमाणे सर्व माडगूळकर आणि सर्व फडके कुटुंबीयांना धन्यवाद व्यक्त केले.

हटके म्युझिक ग्रुपच्या संगीत सेवेचे उपक्रम अत्यंत मनोभावे आणि सातत्याने पार पाडले आहेत. दि. २० एप्रिल २०२४ रोजीगीतरामायणातील संपूर्ण ५६ गीतांचे सलग आठ तास सादरीकरण विनामूल्य आणि सेवाभावातून करण्यात आले. त्यानंतर गीतरामायण महायज्ञ ५६ या उपक्रमाअंतर्गत हेच गीतरामायण ५६ वेळा विविध ठिकाणी देवालये, सेवाभावी संस्था, वृद्धाश्रम,आणिसमाजासाठी कार्य करणा-या संस्थांमध्ये सादर करण्याचा संकल्प घेऊन एक वर्षात तोपूर्ण सुद्धा झाला. १० दिवस सलग देवालयात सकाळीनिवडक गीतरामायणातील गीतेसादर करण्याचा संगीत सेवेच्या उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

अनिल मोटे म्हणाले, गीत रामायण हे केवळ एक काव्यसंग्रहनाही, तर त्यातून अनेक गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत. गीतरामायण हे मराठी भाषेच्या, उच्चारशुद्धतेच्या, लय, ताल, रागआणि रसांच्या शिक्षणाचेही एक अद्वितीय माध्यम आहे. शिरीष कुलकर्णी म्हणाले, यापुढेही हटके म्युझिक ग्रुप या माध्यमातूननवनवीन कार्यक्रम देत, सांगीतिक विश्वात तेजी आणून, अविरत संगीत सेवा देण्याचा अविरत प्रयत्न करत राहील.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments