Newsworldmarathi Mumbai : शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना गणवेश लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षकांना राज्यात ड्रेसकोड लागू होणार, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सूतोवाच केले आहे. ‘ड्रेसकोडसाठी शासन निधी उपलब्ध करुन देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मालेगाव तालुक्यातील अजंग येथील शाळेला त्यांनी भेट दिली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे सुतोवाच केले आहे.
त्यामुळे आता विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही गणवेशात दिसणार आहेत. राज्यातील काही शाळांमधील शिक्षकांना ड्रेसकोड आहे. तर काही जिल्ह्यातील शाळांमध्ये गणवेश नाही, त्यामुळे सरकार सर्वच शाळांमधील शिक्षकांना गणवेश अनिवार्य करणार असल्याचं शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी म्हणाले.
अजंगमधील शाळेत एका कार्यक्रमात बोलताना भुसे म्हणाले, राज्यातील शिक्षकांनाही गणवेशात यावे लागेल. त्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी अजंगच्या शाळेच्या व्यवस्थापनावर कौतुकाची थाप दिली आणि तेथील शिक्षकांचं कौतुक केलं. अजंगच्या शाळेतील शिक्षक हे गणवेशात आले होते, त्यामुळे दादाजी भुसे यांनी अजंगच्या शिक्षकांचं कौतुक केलं.
राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ‘ ड्रेसकोड ‘ लागू करणार असून त्यासाठी खारीचा वाटा म्हणून शासन निधी देखील उपलब्ध करून देणार असल्याचे सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत ओएनजीसी व अवंत फाऊंडेशनच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ( CSR ) अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण करण्यात आले यावेळी मंत्री भुसे बोलत होते.
शिक्षकांना ड्रेसकोड लागू झाल्यास पुढील काळात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणेवशात दिसणार आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून ज्ञानार्जन करावे, पालकांनी मुलांशी संवाद साधावा आणि शाळांनी सहलींसारखे उपक्रम राबवावेत, असेही मंत्री भुसे यांनी यावेळी आवाहन केले.


Recent Comments