Homeपुणेजेईई मेन्स-२०२५ परीक्षेत चाटे शिक्षण समुहाचे २३१ विद्यार्थी यशस्वी

जेईई मेन्स-२०२५ परीक्षेत चाटे शिक्षण समुहाचे २३१ विद्यार्थी यशस्वी

Newsworldmarathi pune : नॅशनल टेस्टींग एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या जेईई-मेन-२०२५ या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच वेबसाईटवर जाहीर झाला असून या परीक्षेत चाटे शिक्षण समुहाच्या चाटे क्लासेस, व ज्युनियर कॉलेजच्या २३१ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षेत यश मिळविले असून ते सर्व विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हॉन्ससाठी पात्र ठरले आहेत. समुहाच्या रूद्र माळगी (९९.४९), यशदिप पोरे (९९.३८), आर्या खापणे (९८.९०), आयुष पोवार (९८.६४), ओम फराकटे (९८.५५) या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले आहे. हे यश चाटे पॅटर्ननुसार मेहनत घेणार्‍या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे आहे असे प्रतिपादन समुहाचे संचालक प्रा. फुलचंद् चाटे यांनी केले.

या निकालाविषयी सविस्तर माहिती देताना प्रा.फुलचंद चाटे म्हणाले, देशभरातील आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि राज्य पातळीवरील शासकीय व अनुदानित अभियांत्रिकी कॉलेजमधील सर्व प्रवेश जेईई-मेन्स आणि अ‍ॅडव्हान्स या परीक्षांच्या आधारे पूर्ण होतात. या परीक्षेमधून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेईई-अ‍ॅडव्हान्स ही परीक्षा १८ मे रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसंबंधी अधिकची माहिती आणि मार्गदर्शनासाठी चाटे शिक्षण समुहाच्या शाखेवर विद्यार्थ्यांनी भेट द्यावी असे आवाहन चाटे व्यवस्थापनातर्पेâ करण्यात आले आहे.

‘जेईई-अ‍ॅडव्हान्स २०२५’ साठी पात्र ठरलेले चाटे शिक्षण समुहाचे काही विशेष गुणवंत विद्यार्थी व त्यांचा एनटीए स्कोर पुढीलप्रमाणे – रूद्र माळगी (९९.४९), यशदिप पोरे (९९.३८), आर्या खापणे (९८.९०), आयुष पोवार (९८.६४), ओम फराकटे (९८.५५), मिहीका कुंभोजकर (९७.६३), हर्षवर्धन शिंदे (९७.३०), सोहम खतकर (९६.५७), श्रेयस फराकटे (९५.४०), ओंकार पाटील (९५.२३), अखिलेश कदम (९४.६४), प्रथम जैन (९४.४७), सृजन कापसे (९४.३७), शृती दिसले (९४.१०), सेजल जाधव (९४.०६), पृथ्वीराज निचिते (९४.०२), सिद्धांत देशमुख (९३.९५), जयवर्धन मोहिते (९३.५५), ओम जंगम (९३.४७), हर्षवर्धन साळुंखे (९३.२९), नीरज कामत (९३.०४), विनीत वडीणगेकर (९२.९०), अभिनव मिश्रा (९२.२९), आयुष पाटील (९२.२७), उझेर सय्यद (९२.१६), तेजस उपड (९१.८३), आदर्श कुंभार (९१.६१), सोहम गुरव (९१.०२).

चाटे शिक्षण समुहाचे कॉलेज व क्लासचे सर्व प्राध्यापक, शाखा व्यवस्थापक, प्राचार्य व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंतांचे त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल अभिनंदन केले व त्यांना पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या़ .

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments