Newsworldmarathi Pune :जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांचा मृत्यू झाला होता. गनबोटे आणि जगदाळे या दोन्ही पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिले त्याचप्रमाणेच यापुढेही खंबीर राहावे, राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून, आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना धीर दिला.
याप्रसंगी गनबोटे यांच्या कोंढवा येथील गंगानगरच्या घरी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, सुनील कांबळे, माजी
मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते. या वेळी गनबोटे यांच्या पत्नी आणि मुलांनी तसेच जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलगी यांनी घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेऊन दहशतवादी हल्ल्याचा घटनाक्रम जाणून घेतला. दहशतवादी हल्ल्यात कौस्तुभगनबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला. गनबोटे आणि जगदाळे दोघे जिवलग मित्र होते.


Recent Comments