Newsworldmarathi soygao : सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बैल धुण्यासाठी साठवण तलावात उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तिसऱ्या मुलाला एका १८ वर्षीय तरुणीने वाचवले. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नांदगाव तांडा येथे घडली आहे. अकील पठाण व रेहान शेख अशी मयतांची नावे आहेत. साकिब पठाण असे बचावलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रेहान हा मामा शकील पठाण यांच्याकडे तर वाचलेला साकिब त्याच्या बहिणीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत नांदगाव तांडा येथे आले होते. शनिवारी तिघेही बैल धुण्यासाठी गावाजवळील साठवण तलावात गेले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.
त्याचवेळी तलावात कपडे धुणाऱ्या महिलांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यातील मनीषा बागुल या तरुणीने जीवाची पर्वा न करता या तिघांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. तिने तब्बल २३ मिनिटे पोहत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यातील साकिबला वाचवण्यात तिला यश आले.
Recent Comments