Newsworldmarathi Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे न्यायालयाच्या आदेशांना झुगारून आपल्याला दररोज धमक्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) माध्यमातून व्हिडीओ आणि फोटो पाठवून आपला छळ करत असल्याची लेखी तक्रार करुणा मुंडे यांनी कुटुंब न्यायालयाकडे केली आहे. त्या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने धनंजय मुंडे यांना यासंदर्भात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
करुणा मुंडे यांनी तक्रारीत नेमकं काय म्हटलंय?
प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. असं असतानाही धनंजय मुंडेकडून आपल्याला दररोज जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार करुणा मुंडे यांनी शनिवारी न्यायालयात नव्या अर्जामार्फत केली आहे. धमक्यांसोबतच एआयचा वापर करून अश्लील व्हिडीओही पाठवले जात असल्याचे देखील करुणा मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
व्हिडीओ आणि फोटोमध्ये व्यक्तीशः आपण नसलो तरीही त्यात आपण असल्याचे दाखवून आपला मानसिक छळ होत असल्याचा आरोप करुणा यांनी केला आहे. तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार दरमहा दोन लाख रुपये यानुसार साल २०२२ पासून आपण आजवर ६० लाख रुपये पोटगीस पात्र असल्याने त्याची धनंजय मुंडे यांच्याकडून वसुली करावी, अशी मागणीही करुणा मुंडे यांनी न्यायालयाकडे केली आहे
तसेच आपल्या नावावर असलेल्या मालमत्तांची विक्री करण्यापासून मज्जाव करण्याचे आदेशही देण्याची मागणी करीत तीन स्वतंत्र अर्ज करुणा मुंडे यांनी वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत केले आहेत.


Recent Comments