Homeबातम्यामध्यरात्री दीड वाजता भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; ९ दहशतवादी तळ केले उद्ध्वस्त!

मध्यरात्री दीड वाजता भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; ९ दहशतवादी तळ केले उद्ध्वस्त!

Newsworldmarathi Team : पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केली जात होती. पाकिस्तानला धडा शिकवला जावा, अशी मागणी केली जात होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारताला समर्थन मिळत होतं. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठका होत असताना लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक केला आहे. या मोहिमेला भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव देण्यात आलं आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हल्ला चढवला. बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबादमधील नऊ ठिकाणे उद्धस्त करत, भारताने दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले. या कारवाईत ३ जणांचा मृत्यू आणि १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments