Newsworldmarathi Mumbai : भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे काही काळासाठी स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 स्पर्धा लवकरच पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. सीमेवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे बीसीसीआयने आयपीएलचे सामने एक आठवड्याकरता थांबवले होते. मात्र, दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर आता आयपीएल पुन्हा सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, IPL पुन्हा १६ किंवा १७ मेपासून सुरू होऊ शकते. उर्वरित सामने चार वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जाण्याची शक्यता आहे. पुन्हा सुरू होणाऱ्या स्पर्धेतील पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयने सर्व फ्रँचायझी, खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि आयोजक यांना आयपीएल पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. यानंतर सर्व संघांनी आपल्या खेळाडूंना परत बोलावण्यास सुरुवात केली आहे.
स्पर्धा स्थगित झाल्याने चाहत्यांमध्ये काहीशी निराशा होती. मात्र आता IPL पुन्हा सुरू होणार असल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
Recent Comments