Homeबातम्याहृदयद्रावक...! अंगावर दगड पडल्याने चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; परिसरात हळहळ

हृदयद्रावक…! अंगावर दगड पडल्याने चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; परिसरात हळहळ

Newsworldmarathi Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सीना नदीच्या काठावर मित्रांसोबत खेळत असलेल्या चार वर्षाच्या मुलाच्या अंगावर दगड पडल्याने जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना नगर तालुक्यातील शिराढोण गावच्या शिवारात सोमवारी (दि. १२) दुपारी घडली. सार्थक नवनाथ गोलवड (वय ४ वर्ष, रा. शिरढोण, ता. नगर) असे मृत बालकाचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, सार्थक गोलवड हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत शिरढोण गावामध्ये सीना नदीच्या काठावर खेळत असताना त्याच्या अंगावर दगड पडल्याने तो बेशुद्ध झाला. त्यास सुनील दरेकर यांनी दुपारी २.५०च्या सुमारास तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून तो औषधोपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. बोठे यांच्या अहवालावरून नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार गणेश लबडे करीत आहेत.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments