Newsworldmarathi Delhi: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. बी. आर. गवई म्हणून प्रसिद्ध असलेल्या न्यायमूर्ती गवई यांच्या नियुक्तीला राष्ट्रपतींनी अधिकृत मंजुरी दिली होती.
न्यायमूर्ती गवई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या शिफारशीनंतर झाली. न्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे २०२५ रोजी संपला. त्यानंतर १४ मे रोजी न्यायमूर्ती गवई यांनी नव्या पदाची सूत्रे हाती घेतली.
त्यांचा कार्यकाळ सुमारे सहा महिन्यांचा असून तो १४ मे २०२५ पासून २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत असणार आहे. न्यायमूर्ती गवई हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना विविध महत्त्वाच्या खटल्यांमध्ये दिलेल्या निर्णयांमुळे ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीने न्यायव्यवस्थेत सामाजिक समावेशाचे प्रतिकात्मक महत्त्वही अधोरेखित झाले आहे.
न्यायमूर्ती गवई हे महाराष्ट्रातील असून त्यांच्या सरन्यायाधीश पदावर झालेल्या नियुक्तीचे विविध स्तरांवरून स्वागत होत आहे. न्यायव्यवस्थेतील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ देशाला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Recent Comments