Newsworldmarathi Pune : Vaishnavi Hagawane Death : पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रा हादरून गेला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच आता वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला पोलिसांनी सात दिवसानंतर अटक केली आहे.
सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज (शुक्रवार) पहाटे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील फरार होते.
याबाबत मिळालेाल्या माहिनुसार, याआधी वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना अटक करण्यात आली होती. वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.
या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. आता या संपूर्ण प्रकरणात न्यायासाठी मोठा आवाज उठवला जात आहे. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, पिंपरीतील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला सहा दिवस उलटलेत, तरी अद्याप पुण्यातील मुळशीचे राजेंद्र हगवणेंना अटक का होत नाही? असा सवाल उपस्थित केला जात होता.
राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. अखेर आज पहाटे पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी त्यांचा ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी छापा टाकत दोघांना ताब्यात घेतलं आहे.


Recent Comments