Homeपुणेममता फाउंडेशनच्या अनाथ युवक-युवती विवाह बंधनात अडकले

ममता फाउंडेशनच्या अनाथ युवक-युवती विवाह बंधनात अडकले

Newsworldmarathi Pune: जन्मताच एचआयव्ही सारखा गंभीर आजार,कुटुंबाने साथ सोडल्याने अनाथ उपेक्षितच जगणं पदरी आलं.मात्र ममता फाउंडेशन संस्थेने आधार दिला.सांभाळ केला,शिक्षण दिले आणि स्वतः च्या पायावर उभे राहिलेले तरुण तरुणी सुखी आनंदी आयुष्याची स्वप्न साकारण्यासाठी लग्नाच्या बेडीत अडकले.या सोहळ्याला अभिनेते,अभिनेत्री व समाजातील प्रतिष्ठात मंडळींनी उपस्थित राहत शुभ आशीर्वाद दिले.

एचआय व्ही बाधित अनाथ उपेक्षितांचा सांभाळ करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ममता फाउंडेशन संस्थेची स्थापना 200८ मध्ये डॉ.शिल्पा बुडूख व अमर बुडूख यांनी केली.सुरुवातीला भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या संस्थेला माजी नगरसेवक प्रकाश कदम यांनी तीन गुंठे मोफत जागा दिली.संस्थेने स्वतःची इमारत उभारली.

या संस्थेतील युवती चिरंजीवी रुपाली व चि.महेश ,ममता परिवाराचा चिरंजीव आकाश व चिरंजीवी दिव्या यांचा शुभविवाह पारंपरिक पद्धतीने पार पडला.हळद, मेंहदी, बॉन्ड यांनी वालावरण प्रसन्न झाले होते.

माजी नगरसेवक प्रकाश कदम, अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, अभिनेता जगन्नाथ निवंगुणे,माजी सरपंच दीपक गुजर यांनी वधू वरांना शुभ आशीर्वाद दिले.यावेळी शरद सोनवणे,प्रमोद ढसाळ,पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, संगीता यादव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचलन अँड दिलीप जगताप यांनी केली.

ममता फाउंडेशन संस्थेत अंगा खांद्यावर खेळवळलेली माझी लेकरं आज विवाह बंधनात अडकली. कन्यादान व सोहळा आनंदाश्रूनी सोहळा पार पाडला.आज खऱ्या अर्थाने संस्था स्थापनेचे सार्थक झाले असे वाटते.उपेक्षित म्हणून बेवारस झालेल्या लेकरांची मी माय पूर्वीच झाले आज सून आणि जावई देखील आले.

-डॉ.शिल्पा बुडूख.संचालिका ममता फाउंडेशन.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments