Newsworldmarathi Pune: पुण्यातील खडकवासला मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शंकर सर्जेराव धुमाळ (वय 47) या व्यक्तीला अखेर सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी वारंवार आमदारांच्या घराजवळ येऊन गोंधळ घालत, सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करत धमक्या देत होता.
धनकवडी येथील आमदार निवासस्थानाजवळ धुमाळने तीन वेळा घुसण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला किरकोळ कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याच्या पुनरावृत्तीमुळे आमदारांनी थेट पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तातडीची कारवाई करण्याची मागणी केली होती.
आखेर पोलिसांनी उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या सूचनेनुसार धुमाळ याला अटक केली. त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी ही घटना सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपी शंकर धुमाळ हा व्यक्ती वारंवार आमदार भीमराव तापकीर यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत होता. त्याने तीन वेळा आमदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याने शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती.
सुरुवातीला आमदारांच्यावतीने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. सुरुवातीला आरोपीवर किरकोळ स्वरूपाची कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतरही तो पुन्हा पुन्हा येत राहिला आणि शिवीगाळ करत धमक्या देत राहिला. या प्रकरणात कारवाई न झाल्यामुळे आमदारांनी थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.


Recent Comments