Homeबातम्याअजितदादांच्या कार्यकर्त्यात दम असेल तर आज संध्याकाळी बारामतीत येतोय, मला अडवून दाखवा...

अजितदादांच्या कार्यकर्त्यात दम असेल तर आज संध्याकाळी बारामतीत येतोय, मला अडवून दाखवा !! लक्ष्मण हाके यांचे थेट चॅलेंज..

बारामती : सध्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी असा वाद पेटला आहे. लक्ष्मण हाके पंढरपूर येथे असताना त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. मी रोज दोन ते तीन जिल्ह्याची बॉर्डर पार करतोय. सुरत चव्हाण यांच्या अंगात जर फार खुमखुमी असेल तर सुरज चव्हाण आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यात दम असेल तर मी आज संध्याकाळी बारामतीत येतोय.

मला अडवून दाखवावं असं चॅलेंज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलं आहे. यामुळे आता वातावरण तापले आहे. नुकताच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अर्थखात्यावरून निशाणा साधला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून हाकेंवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यामुळे वाद वाढत गेला.

राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी हाके हे देशी दारुचे ब्रँड अॅम्बेसिडर आहे, अशी जिव्हारी लागणारी टीका केली. तर त्यांना धडा शिकवण्याची भाषा केली होती. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीला थेट खुले आव्हान दिले आहे. सुरत चव्हाण यांच्या अंगात जर फार खुमखुमी असेल तर सुरज चव्हाण आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यात दम असेल तर मी आज संध्याकाळी बारामतीत येतोय.

मला अडवून दाखवावं असं चॅलेंज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलं आहे. दरम्यान, सुरज चव्हाण प्रश्नावर बोला आम्ही फक्त निधी मागतोय तुम्ही काय वैयक्तिक टीका करताय, असे हाके म्हणाले. अजितदादा असली पिल्लावळ माझ्यावर बोलायला सोडताय, तुमचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments