Newsworldmarathi Pune: पुणे शहर राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार सुनील टिंगरे आणि माजी नगरसेवक सुभाष जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्षपदी रूपाली ठोंबरे, हाजी फिरोज शेख, प्रदीप देशमुख आणि अक्रूर कुदळे यांना संधी देण्यात आली आहे.
शहराध्यक्ष म्हणून सुनील टिंगरे यांच्याकडे वडगाव शेरी, कॅन्टोन्मेंट, कसबा आणि हडपसर या भागांची जबाबदारी असणार आहे. तर सुभाष जगताप यांच्याकडे पर्वती, शिवाजीनगर, खडकवासला आणि कोथरूड विभाग सोपवण्यात आला आहे.
यापूर्वीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर जवळपास महिनाभर रिक्त असलेल्या शहराध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने आता दोन प्रमुख नेत्यांची नेमणूक करत संघटनात्मक बळ वाढवले आहे.


Recent Comments