Newsworldmarathi Pune: राज्य सरकारने पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांची महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीच्या तज्ज्ञ सदस्यपदी नियुक्ती केली आहे. डॉ. भोई हे गेल्या अनेक वर्षांपासून भोई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. ही समिती राज्याचे नवे युवा धोरण ठरविणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई हे पुण्यातील प्रसिद्ध कान नाक घसा (ईएनटी) तज्ज्ञ आहेत. सध्या ते भोई प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. शिवाय ते राष्ट्रीय युवा पुरस्काराचे मानकरी आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील युवकांसाठी विविध प्रकारचे रचनात्मक आणि विधायक उपक्रम राबविण्यात येतात. हे उपक्रम राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया डॉ. भोई यांनी या निवडीनंतर बोलताना दिली. याशिवाय अमली पदार्थ, गुन्हेगारी, सायबर क्राईम, फेसबुक क्राईम अशा विविध गोष्टींच्याविरोधात लढण्यासाठी मी या समितीच्या माध्यमातून कार्यरत राहीन, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा खात्याने राज्याचे सुधारीत युवा धोरण तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती राज्याचे सुधारित युवा धोरण ठरविण्यासाठी शिफारशी करणार आहे. याआधी राज्यातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने “महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण, २०१२ घोषित केले आहे. या युवा धोरणास १० वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. या धोरणाचा आढावा घेऊन महाराष्ट्र राज्याचे सुधारीत युवा धोरण तयार करण्यासाठी ही नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये आमदार संतोष दानवे, राजेश पवार, आशुतोष काळे, अमोल मिटकरी, श्रीकांत भारतीय,
सत्यजित तांबे आदींसह २१ सदस्यांचा समावेश आहे.


Recent Comments