Newsworldmarathi Pune: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण प्रचंड गाजत असतानाच आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे. या प्रकरणात अडचणीत सापडलेल्या आयपीएस जालिंदर सुपेकर यांचे मेहुणे आणि खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्याविषयी गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट)च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे म्हणाल्या, “शशिकांत चव्हाण यांच्याकडे पुण्यात सुमारे ७०० ते ८०० कोटींची मालमत्ता असण्याची शक्यता आहे.” त्यांनी यासंदर्भात आरटीआय अंतर्गत माहिती मागवली होती, मात्र त्यांना अपेक्षित माहिती देण्यात आली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
अंधारे यांनी सांगितले की, रावेतमधील एलिगन्स स्कीममध्ये चव्हाण कुटुंबीयांची मोठी गुंतवणूक आहे आणि या स्कीममधील एकाच फ्लॅटची किंमत सुमारे २.५ कोटी रुपये आहे. एवढ्या संपत्तीचा उगम कसा आणि कुठून झाला याची चौकशी गृहमंत्र्यांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय, वैष्णवी प्रकरणात चव्हाण यांचा हस्तक्षेप असून, चोंधे कुटुंबीयांशी जवळचा संबंध असल्यामुळेच तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
अंधारे म्हणाल्या, “इतकी प्रचंड मालमत्ता असूनही, एका महिलेच्या न्यायासाठी का दुर्लक्ष केलं जातंय? शशिकांत चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असूनसुद्धा त्यांना पदोन्नती मिळते, यावरही गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं.” अशी मागणी सुषमा अंधारे


Recent Comments