Homeभारतपुण्यातून बाहेर पडणं होणार सोपं; हडपसर ते यवत सहापदरी उड्डाणपुल मंजुर !

पुण्यातून बाहेर पडणं होणार सोपं; हडपसर ते यवत सहापदरी उड्डाणपुल मंजुर !

newsworldmarathi Pune: Pune-Solapur Highway Update : पुण्यातून सोलापूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. हडपसर ते यवत दरम्यान २५ किमी लांबीचा सहा पदरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील दैनंदिन वाहतूक कोंडीचा कायमचा प्रश्न सुटणार आहे.

या उड्डाणपुलासाठी सुमारे ५,२६२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) तत्वावर उभारण्यात येणार असून, MSIDC याची अंमलबजावणी करणार आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५वरील हडपसर, मांजरी फाटा, लोणी काळभोर, उरळी कांचन या ठिकाणी दररोज सकाळ-संध्याकाळच्या वेळेत होणाऱ्या भीषण ट्रॅफिकमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या भागातील झपाट्याने वाढलेलं शहरीकरण आणि रहदारीच्या झपाट्यानं प्रशासनाला ही पावलं उचलावी लागली.

या प्रकल्पामुळे होणारे फायदे:
प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार
वाहतूक अधिक गतिमान आणि सुरक्षित
जिल्ह्यातील शहरी भागांना दिलासा

उड्डाणपूलासोबतच विद्यमान महामार्गही ६ पदरी विस्तारित केला जाणार आहे. यामुळे संपूर्ण रस्त्याचा दर्जा आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारेल. हा निर्णय फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपसचिव प्रज्ञा वाल्के यांच्या स्वाक्षरीने शासकीय आदेश जारी झाला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments