Homeबातम्यामोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला, प्रभाग रचनेचे आदेश...

मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला, प्रभाग रचनेचे आदेश जारी, जाणून घ्या महापालिकांचे प्रभाग…

पुणे : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक अयोगाने दिलेल्या आदेशानुसार नगरविकास विभागाने महापालिका, नगरपालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी प्रभागरचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisements

तसेच राज्यातील ड वर्गातील १९ महापालिकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक या ९ अ, ब, क वर्ग महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभागरचना करण्यात येणार आहे.

Advertisements

तसेच मुंबई महापालिकेसाठी एम सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. कोरोना आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लटकल्याने या निवडणुका रखडल्या होत्या. आता मात्र हालचाल सुरू केली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे.

नगरविकास विभागाने या अ, ब, क वर्ग १० महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार आता तयारी करावी लागणार असून तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच ड वर्ग १९ महापालकांची प्रभागरचना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान, प्रभाग रचनेसाठी साधारण अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यासाठी गुगल मॅपचा आधार घेण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे आता इच्छुकांनी देखील जोरदार तयारी केली असून लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी नेते हजर राहत आहेत.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments