Newsworldmarathi Pune: पावसाळ्याच्या आगमनासोबतच विठ्ठल भक्तांच्या मनात पंढरीच्या वारीची ओढ जागी होते. “माऊली… माऊली…”चा गजर करत हजारो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत येतात.
यंदा 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी असून, मानाच्या 10 पालख्यांसह लाखो भक्त पंढरीच्या वाटेवर भक्तीत लीन होत आहेत. यामध्ये आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूतील संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. अनुक्रमे 18 आणि 19 जून रोजी या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वेळापत्रक 2025
19 जून: आळंदीहून प्रस्थान (गुरुवारमुळे संध्याकाळी 8 वाजता)
20 जून: आळंदी ते पुणे
21 जून: पुणे मुक्काम
22 जून: पुणे ते सासवड (दिवेघाटात वारकरी खेळ)
23 जून: सासवड मुक्काम
24 जून: सासवड ते जेजुरी (भंडारा उधळण)
25 जून: जेजुरी ते वाल्हे (खंडोबा दर्शन)
26 जून: वाल्हे ते लोणंद (सातारा जिल्हा प्रवेश)
27 जून: लोणंद ते तरडगाव
28 जून: तरडगाव ते फलटण
29 जून: फलटण ते बरड
30 जून: बरड ते नातेपुते (सोलापूर जिल्हा प्रवेश, बरड येथे गोल रिंगण)
1 जुलै: नातेपुते ते माळशिरस (सदाशिवनगर येथे गोल रिंगण)
2 जुलै: माळशिरस ते वेळापूर (खुडूस येथे गोल रिंगण)
3 जुलै: वेळापूर ते भंडी शेगाव (ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण, टप्पा येथे बंधू भेट)
4 जुलै: भंडी शेगाव ते वाखरी (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
5 जुलै: वाखरी ते पंढरपूर, पौर्णिमेपर्यंत मुक्काम (वाखरी येथे गोल रिंगण)
6 जुलै: आषाढी एकादशी, नगरप्रदक्षिणा
10 जुलै: पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास
संत तुकाराम महाराज पालखी वेळापत्रक 2025
18 जून: देहू येथे प्रस्थान, इनामदार वाड्यात मुक्काम
19 जून: देहू ते निगडी-आकुर्डी, आकुर्डी मुक्काम
20 जून: आकुर्डी ते पुणे (नाना पेठ मुक्काम)
21 जून: पुणे (निवडुंगा विठ्ठल मंदिर मुक्काम)
22 जून: पुणे ते हडपसर-लोणी काळभोर, मुक्काम
23 जून: लोणी काळभोर ते यवत, मुक्काम
24 जून: यवत ते वरवंड चौफुला, मुक्काम
25 जून: वरवंड ते उंडवडी गवळ्याची, मुक्काम
26 जून: उंडवडी गवळ्याची ते बारामती, मुक्काम
27 जून: बारामती ते सणसर (काटेवाडी येथे मेंढी-बकऱ्यांचे रिंगण)
28 जून: सणसर ते बेलवाडी-निमगाव केतकी, मुक्काम (बेलवाडी येथे गोल रिंगण)
29 जून: निमगाव केतकी ते इंदापूर, मुक्काम (इंदापूर येथे गोल रिंगण)
30 जून: इंदापूर ते सराटी, मुक्काम
1 जुलै: सराटी ते अकलूज, मुक्काम (सोलापूर जिल्हा प्रवेश, अकलूज येथे गोल रिंगण)
2 जुलै: अकलूज ते बोरगाव, मुक्काम (माळीनगर येथे उभे रिंगण)
3 जुलै: बोरगाव ते पिराची कुरोली, मुक्काम
4 जुलै: पिराची कुरोली ते वाखरी, मुक्काम (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
5 जुलै: वाखरी ते पंढरपूर, मुक्काम (वाखरी येथे उभे रिंगण)
6 जुलै: आषाढी एकादशी, नगरप्रदक्षिणा, चंद्रभागा स्नान
10 जुलै: पंढरपुरातून देहूकडे परतीचा प्रवास
वारीची तयारी जोमात
ऊन-पावसाची पर्वा न करता विठुरायाच्या भक्तीने भारलेले वारकरी पंढरीच्या वाटेवर चालतात. यंदाच्या वारीसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या सहभागी होत असून, प्रशासनानेही तयारी पूर्ण केली आहे. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे हे वेळापत्रक वारकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.


Recent Comments