Newsworld Pune : पुणे-सोलापूर रोडवर पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. शुक्रवार पासून रोजी रात्री 8 वाजता काम सुरु करण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यांत पूर्ण होणार असून पहिला टप्पाbपुणेकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रोडवर खोदकाम होणार आहे तर दुसरा टप्पा सोलापूरहून पुण्याकडे येणाऱ्या रोडवर खोदकाम करण्यात येणार आहे. तरी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा उपयोग करून सहकार्य करावे आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे
हा बदल पुढीलप्रमाणे असेल:
वाहतूक बदलाचे तपशील:
1. सोलापूरहून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक:
– अर्जुन रोड, मम्मादेवी चौक मार्गे स्वारगेटकडे जाणार. यामध्ये कोणताही बदल नाही.
2. स्वारगेटहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक:
– मम्मादेवी चौक सरळ जाण्यास बंदी.
– वाहने डावीकडे वळून बिशप सर्कलमार्गे उजवीकडे वळून सोलापूर रोडला जातील.
– सदर मार्ग वन वे करण्यात येणार आहे.
3. सोलापूरवरून मम्मादेवी चौकात येणारी वाहने:
– सरळ मम्मादेवी गोळीबार चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
4. डॉ. कोयाजी रोडमार्गे येणारी वाहने:
– हरप्रीत मंदिर चौकात उजवीकडे वळून खाणे मारुती चौक, पुलगेट बस डेपोमार्गे कोंढव्याला जातील.
5. सोलापूरहून येणारी वाहने (मम्मादेवी चौकात):
– उजवीकडे वळण्यास बंदी.
– ही वाहने गोळीबार चौकमार्गे सरळ जाऊन, उजवीकडे वळून कॅम्प मार्गे इच्छितस्थळी जातील.