Homeमहाराष्ट्रमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

Newsworld Mumbai : राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी (दि. 5) शपथ घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. दरम्यान, नुकतेच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Advertisements

हर्षवर्धन पाटील यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले. आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या हातून राज्यातील जनतेची सेवा घडेल, आपले राज्य बलशाली बनेल, ही सदिच्छा व्यक्त करतो. शेतकरी, कष्टकरी, तरुणांच्या हिताचे निर्णय होतील, ही अपेक्षा. उज्ज्वल महाराष्ट्र घडवण्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा.

हर्षवर्धन पाटील यांची ही भेट राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानली जात आहे, विशेषतः त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर. त्यांच्या या भेटीमुळे आगामी राजकीय समीकरणांबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्या निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने पाटील यांना पक्षात मानाचं स्थान दिले.

अशा पार्श्वभूमीवर, आता राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या या भेटीमुळे आगामी राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पाटील यांच्या निर्णयावर राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments