Homeपुणेमहाराष्ट्रातील तीन तरुणांचा अमेरिकेत डंका; दोन वर्षांत 5 रेस्टॉरंट!

महाराष्ट्रातील तीन तरुणांचा अमेरिकेत डंका; दोन वर्षांत 5 रेस्टॉरंट!

Newsworldmarathi Pune : कोरोना महामारीमुळे हाॅटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊन देखील संधी मिळताच आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील साहिल बढे व शिर्डीचा निरज फापाळे यांनी 2023 मध्ये अमेरिकेत ऑस्टीन येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी मिळवली. या हाॅटेलमध्ये एक वर्ष नोकरी केल्यानंतर ऑक्टोबरमध्ये खाजगी इंडियन रेस्टॉरंटमध्ये नोकरी करत असताना अमेरिकेत इंडियन रेस्टॉरंटमध्ये प्रचंड बिझनेस ग्रोथ व मोठी संधी असल्याचे साहिल व निरज यांच्या लक्षात आले.

Oplus_0

याच कालावधीत ठाण्याचे शेखर रिकामे यांची साहिल व निरज यांना साथ मिळाली. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील या तीन तरुणांनी एक नाही तर तब्बल पाच रेस्टॉरंट सुरू केले आहेत.
साहिल बढे यांने पुण्यात एसएसपीएमएस काॅलेजमध्ये हाॅटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. शिक्षण सुरू असतानाच कोरोना महामारी आली व दोन वर्षे शिक्षणाला ब्रेक लागला.

लाॅक डाऊनमुळे परदेशात इंटर्नशिपसाठी आलेली संधी व व्हीसा रद्द करावा लागला. परंतु 2023 मध्ये परिस्थिती सुधारल्यावर थेट नोकरीसाठी अमेरिकेतील ऑस्टीन शहरातील एक पंचतारांकित हाॅटेल मध्ये संधी मिळाली. येथेच साहिलीची ओळख शिर्डीचा निरज यांच्या सोबत ओळख झाली. या पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असतानाच या दोन मित्रांनी अमेरिकन एक वाहन खरेदी करून नोकरी वरून सुटल्यानंतर कुरिअर, हाॅटेल पार्सल पुरविण्याचे काम देखील केले. या कामामुळे लवकर संपूर्ण ऑस्टीन शहर व लगतच्या परिसराचा चांगला परिचय व अभ्यास देखील झाला.

एक वर्षांच्या जे- वान (J-1) व्हीसवर काम केल्यानंतर ऑस्टीन येथील एका खासगी इंडियन रेस्टॉरंटमध्ये साहिल व निरज ने नोकरी पत्करली. व्हीसचा विषय अंत्यत सफाई पणे हातळला. याच कालावधीत साहिल व निरज यांची शेखर रिकामे यांच्याशी ओळख झाली व ऑस्टीनमध्ये पार्टनरशिप मध्ये इंडियन रेस्टॉरंट सुरू करण्याची ऑफर दिली. साहिल व निरज यांची कष्ट करण्याची तयारी होती व शेखर रिकामे यांनी विश्वास दाखविल्यावर त्वरित पार्टनरशिपमध्ये हाॅटेल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पंचतारांकित हॉटेलचा एक वर्षांचा ऑस्टीन शहरातील अनुभव व कुरिअर सेवेमुळे झालेला शहराचा परिचय व खडानखडा माहिती नवीन हाॅटेल सुरू करताना खूप उपयोगी ठरले. शेखर रिकामे यांच्या सोबत साहिल व निरज यांनी ऑस्टीन शहरामध्ये पहिले . …” टीका हाऊस” नावाने पहिले रेस्टॉरंट सुरू केले.

पहिल्या दोन तीन महिन्यांतच टीका हाऊस इंडियन रेस्टॉरंट ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अतिवृत्कष्ट जेवण, फास्ट सर्विस मुळे लगतच्या शहरांमध्ये टीका हाऊस ची चर्चा सुरू झाली व मागणी देखील वाढली. याच संधीचा फायदा घेत व शेखर रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली साहिल व निरज यांनी दोनच वर्षांत टिक्का हाऊस ऑस्टिन डाउनटाउन , टिक्का हाऊस कॉलेज स्टेशन , टिक्का हाऊस वाको , टिक्का हाऊस एक्सप्रेसवे, टिक्का हाऊस लेकवे रेस्टॉरंट सुरू करण्यात यशस्वी झाले. महाराष्ट्रातील या तीन तरुणांनी परदेशात जाऊन भारतातील व स्थानिक तब्बल 60_70 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments