Homeपुणेरमणबाग शाळेच्या शालाप्रमुख चारुता प्रभुदेसाई यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ

रमणबाग शाळेच्या शालाप्रमुख चारुता प्रभुदेसाई यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ

Newsworldmarathi Pune: न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेच्या कार्यक्षम व सृजनशील मुख्याध्यापिका चारुता शरद प्रभुदेसाई आपल्या ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३०जून २०२५ रोजी सेवानिवृत्त झाल्या.न्यू इंग्लिश स्कूल,रमणबाग प्रशालेमध्ये त्यांनी 33 वर्षे इंग्रजी व मराठी या विषयाचे अतिशय प्रभावीपणे अध्यापन तर केलेच
पण त्याचबरोबर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम,नाट्यवाचन,वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कवितालेखन हा त्यांचा आवडता छंद असून त्यांच्या आजवर अनेक कविता शाळेच्या कार्यक्रमांमध्ये चाल लावून सादर झालेल्या आहेत.त्यांनी स्वतः लिहिलेल्या अनेक प्रसंगानुरूप मजकूरांनी व कवितांनी शाळेचे फळे नेहमीच सजलेले असायचे. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात देखील त्यांची कविता समाविष्ट झालेली आहे.शाळेचा वार्षिक अंक तेजोनिधीचे अनेक वर्षे संपादिका म्हणून काम पाहिले आहे.

मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे,शाळेच्या परिपाठाकडे शिस्त व अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले.त्यांच्या स्वरचित आरत्यांचे ‘आशय आरती’हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांसाठी कथादीप दिवाळी अंक,चंदर आणि इतर कथा अशी त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या सेवागौरवपूर्ती समारंभास पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी आवर्जून उपस्थित होत्या.व्यासपीठावर शाळासमिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर, अखिल भारतीय काँग्रेस समिती सदस्य गोपाळदादा तिवारी कार्यक्रमास उपस्थित होते. उपमुख्याध्यापक जयंत टोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

शिक्षक प्रतिनिधी प्रतिभा जक्का यांनी शिक्षकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले.परिचय दीप्ती डोळे यांनी करुन दिला तर आभार पर्यवेक्षिका अंजली गोरे यांनी मानले.कार्यक्रमास पर्यवेक्षिका मंजूषा शेलूकर,सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी,तसेच माजी विद्यार्थी व हितचिंतक उपस्थित होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments