Homeपुणेअपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश : चंद्रकांत बावनकुळे यांनी दिले आदेश

अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश : चंद्रकांत बावनकुळे यांनी दिले आदेश

Newsworldmarathi Pune: जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांकडून सामान्यजनांना मिळणारी वागणूक ही सर्वांना माहितच आहे. अशाच एका खासगी कामासाठी गेलेल्या एका कार्यकर्त्याला अधिकाऱ्यांकडून अपमानजनक वागणूक मिळाली. मात्र, या विषयी भारतीय जनता पक्षाचे महसूल मंत्री चंद्रकात बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली असताना त्यांनी तातडीने दखल घेत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही अंकुश बसू शकतो या जाणीवेमुळे एक चांगली चपराक बसली आहे.

रॉयल ग्रुपचे संचालक आणि भारतीय जनता पक्षाचे सभासद प्रफुल कोठारी हे आपल्या एका खासगी कामासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण लोकसेवक आहोत याची जाणीव न राहिल्याने कदम यांनी कोठारी यांना अपमानास्पद वागणूक दिली. अशा कामांसाठी सारखे सारखे पन्नास वेळा येऊ नका, इथं परत यायचं नाही, असे त्यांना कटू शब्दांत सुनावले.

अधिकाऱ्यांनी अशी पद्धतीने चारचौघांत अवमानित केल्याने कोठारी यांना खूप वाईट वाटले. या घडलेल्या प्रकारांची दखल कोण घेणार असा प्रश्न त्यांना वाटू लागला. म्हणून त्यांनी महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना एक मेसेज पाठवला आणि घडलेला प्रकार तक्रारीच्या स्वरुपात त्यांना कळवला. विशेष म्हणजे जागरुक असलेल्या बावनकुळे यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेतली आणि संबंधित प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी अद्याप कारवाई झालेली नसली तरीदेखील कार्यकर्त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाते हा दिलासा मोठा असल्याचे कोठारी यांनी सांगितले.

या विषयी ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांप्रति इतकी संवेदनशीलता खरोखरीच कौतुकास्पद आहे. या प्रकरणाविषयी मी फक्त एक मेसेज केलेला होता. परंतु त्याची तत्काळ दखल घेतली गेली आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याविषयी त्यांनी आदेश दिले. माझ्या सारख्या कार्यकर्त्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे सामान्य जनतेला कशीही वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांनीही यातून धडा घेऊन आपण लोकांना प्रतिसाद द्यायला हवा हे शिकले पाहिजे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments