Newsworldmarathi Pune: पुणे शहरातील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोंढवा परिसरात (Kondhva) बुधवारी रात्री घडलेली घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी ठरली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर एका अज्ञात इसमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने कुरिअर बॉय असल्याचं सांगत सोसायटीत प्रवेश मिळवला आणि तोंडावर केमिकल स्प्रे करत पीडितेवर अत्याचार केला.
घटना २ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. तरुणी आपल्या भावासोबत कोंढव्यात राहत असून, मूळची अकोल्याची आहे. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील एका कंपनीत काम करते. आरोपीने बँकेचं कुरिअर असल्याचं सांगून दरवाज्याशी बोलणी केली आणि सहीची जबाबदारी असल्याचं सांगून सेफ्टी डोअर उघडायला लावलं. त्याच क्षणी त्याने तोंडावर केमिकल स्प्रे करून तरुणीला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर बलात्कार केला.


Recent Comments