Newsworldmarathi Pune: सोलापूर महामार्गावर वाहनाची वाट पाहत बसलेल्या सहा जणांना एका भरधाव पिकअप चालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौघेजण गंभीर जखमी आहेत. बुधवारी (ता. 0२) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौकात हा अपघात झाला.
या अपघातात अशोक भीमराव (वय- २५, रा. बसनाळ सावली बिदर कर्नाटक), व मेहबूब रहमान मियाडे (वय-६७, रा. माकर वस्ती सहजपुर ता. दौंड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
तर या अपघातात भारती लक्ष्मण बापूराव रा. आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली), मैनुद्दीन लालमिया तांबोळी (वय ६७, रा. आंबा पिंपळगाव, लातूर), वैशाली भागवत बनसोडे (वय ४०,रा. सोरतापवाडी ता. हवेली, पुणे), भागवत बनसोडे वय-४५, हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.


Recent Comments