Newsworldmarathi pune: पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ‘आज का आनंद’चे शैलेश काळे यांची निवड झाली. कार्यवाहपदी ‘पुढारी’चे पांडुरंग सांडभोर, तर खजिनदारपदी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सुनीत भावे यांची निवड करण्यात आली.
पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या झालेल्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. इतर विश्वस्त पुढीलप्रमाणे : विठ्ठल जाधव (सामना), राजेंद्र पाटील (सार्वमत) आणि अंजली खमितकर (प्रभात).
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील हे प्रतिष्ठानचे पदसिद्ध विश्वस्त आहेत.


Recent Comments