Newsworldmarathi Pune : शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित तसेच सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सेव्हन लव्हज चौक परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला आजपासून सुरुवात झाली. या रस्ता रुंदीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.
मा. नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने संबंधित विभागांकडे पाठपुरावा करत हा विषय प्राधान्याने पुढे नेला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून जवळपास १७ फूट रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीतील अडथळे कमी होऊन सुरक्षिततेची हमी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कामाचे भूमिपूजन मा. नगरसेविका अर्चना तुषार पाटील आणि पुणे महानगरपालिकेचे उपाध्यक्ष तुषार पाटील यांच्या हस्ते पार पडले. भूमिपूजनावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाधान व्यक्त केले.
नागरिकांनी सांगितले की, सेव्हन लव्हज चौक परिसरात दररोज प्रचंड वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे अपघाताचा धोका कायम निर्माण होत असे. रस्ता रुंदीकरणानंतर या भागातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असून पादचारी आणि वाहनधारक दोघांसाठीही सुलभता निर्माण होणार आहे.
या उपक्रमामुळे शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार असल्याचे मत मा. नगरसेविका अर्चना पाटील यांनी व्यक्त केले.


Recent Comments