Newsworldmarathi Pune: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा मुळशी तालुका पश्चिम मंडळाच्या वतीने “वृक्षारोपण – एक पेड माँ के नाम” हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम भाजप जिल्हाध्यक्ष शेखर वढणे आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव सोलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
वृक्षारोपण उपक्रम मुळशी तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळा, आयटीआय, तसेच कॉलेजेसमध्ये आयोजित करण्यात आला. या अभियानाचा उद्देश पर्यावरण संवर्धनाबरोबरच पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या “सेवा हेच परमधर्म” या संदेशाशी सुसंगत पद्धतीने समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करणे हा होता.
हा उपक्रम भारतीय जनता युवा मोर्चा मुळशी पश्चिम मंडळ अध्यक्ष लखन तात्याबा गोळे यांच्या पुढाकाराने यशस्वीपणे पार पडला. या वेळी माजी अध्यक्ष राजाभाऊ वाघ, महामंत्री सुनील शिंदे, सरचिटणीस यशवंत धुमाळ, सरचिटणीस अमोल गोळे, माजी अध्यक्ष एस.सी. मोर्चा निलेश लांडगे, युवा मोर्चा सरचिटणीस संजय दूरकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष संजय पांढरे, युवा मोर्चा चिटणीस सचिन उभे, सोपान बागडे, सचिव सुयोग गोळे, सचिव सागर सुतार, सामाजिक कार्यकर्ते अजय सुतार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वृक्षारोपण करून सामाजिक जबाबदारीची जाणीव अधोरेखित केली. निसर्ग संवर्धनाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल हीच खरी सेवा असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले. वृक्षारोपणासोबतच “हरित मुळशी, समृद्ध भारत” हे ब्रीद घेऊन सर्वांनी अधिक जबाबदारीने पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.
या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात पर्यावरणाबद्दल सकारात्मक संदेश पोहोचला. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून, ती पुढील पिढ्यांसाठी हिरवाई टिकवण्याची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केले.
“एक पाऊल समृद्धीकडे – एक पाऊल सेवेकडे!” या संदेशासह सेवा पंधरवड्यातील वृक्षारोपण उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला.


Recent Comments