Homeभारतवैद्यरत्न डॉ. चंद्रकुमार देशमुख यांना ‘आयुष महासन्मान पुरस्कार २०२५’

वैद्यरत्न डॉ. चंद्रकुमार देशमुख यांना ‘आयुष महासन्मान पुरस्कार २०२५’

Newsworldmarathi Mumbai:आयुर्वेद क्षेत्रातील अद्वितीय कार्याबद्दल वैद्यरत्न डॉ. चंद्रकुमार देशमुख यांना ‘आयुष महासन्मान पुरस्कार २०२५’ने सन्मानित करण्यात आले. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व विस्तार केंद्र–राजकोट (टीडीसी पीपीडीसी) आग्रा, MSME मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील एका तारांकित हॉटेलमध्ये हा भव्य सोहळा पार पडला.

समारंभास देशभरातील शेकडो आयुष चिकित्सक व थेरपिस्ट उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय सिनेस्टार श्रेया बुगडे, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, डॉ. मंगला कोहली (सल्लागार – UN Child Women व माजी सहायक महानिदेशक, आरोग्य सेवा निदेशालय, भारत सरकार) तसेच डॉ. प्रवीण जोशी (राष्ट्रीय सल्लागार – AIMA व माजी उपनिदेशक, TDC आग्रा) उपस्थित होते.

विशेष अतिथी म्हणून गणेश एम. (सहाय्यक संचालक, विस्तार केंद्र–राजकोट व उदयपूर, MSME TDC, आग्रा) आणि प्रणव पंड्या (प्रशिक्षण अधिकारी, MSME राजकोट) यांनी हजेरी लावली. या मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. देशमुख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आयुर्वेद क्षेत्रातील योगदानामुळे डॉ. देशमुख यांना यापूर्वीही अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी त्यांना ‘वैद्यरत्न २०२५’, ‘आंतरराष्ट्रीय आयुर्वेद प्रसारक’ (नेपाळ सरकारतर्फे) तसेच ‘वारी वैद्य पुरस्कार’ (माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते) हे सन्मान मिळाले आहेत.

या सर्व पुरस्कारांनी डॉ. चंद्रकुमार देशमुख यांचे कार्य अधिक उज्ज्वल झाले असून, आयुर्वेद चिकित्सा व संशोधन क्षेत्रासाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर प्रसार होत असून, नव्या पिढीतील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ते आदर्शवत ठरले आहेत.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments