Newsworldmarathi Pune: शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून सुखसागरनगर येथील अंबा माता मंदिरात भक्तिमय वातावरणात देवीची घटस्थापना करण्यात आली. यावर्षी मंजू राजेश राठी व राजेश धनराज राठी यांच्या हस्ते विधिवत स्थापना झाली.

या मंदिराची स्थापना १९९३ मध्ये स्व. धनराज मालचंद राठी यांनी केली. त्यानंतर दरवर्षी नवरात्र महोत्सवासह महाशिवरात्री, दत्तजयंती, हनुमान जयंती, जन्माष्टमी, श्रावण मास, दहीहंडी यांसारखे धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
नवरात्र महोत्सवात दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती होते. देवीचे नवीन रूप पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. मंदिर परिसरात भोंडला, भजन, प्रवचन, श्रीसुक्त पठण यांचे आयोजन केले जात आहे. यंदाच्या महोत्सवात १५१ कन्यांचे कन्यापूजन तसेच हलवा पुरी प्रसादाचे वितरण होणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गेल्या २९ वर्षांत देवीच्या आशिर्वादाने अनेक सकारात्मक बदल परिसरात झाले आहेत. मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी मैनाबाई धनराज राठी यांच्या मार्गदर्शनाखाली राठी कुटुंब मनोभावे पार पाडत आहे. महिला व मुलांसाठी खाऊ वाटपही करण्यात आले आहे.
मंदिराचे पदाधिकारी मगराज राठी म्हणाले, “अंबा माता मंदिर हे सुखसागर कात्रज परिसरातील श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र आहे. नवरात्र महोत्सवाने परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण होते.”


Recent Comments