Newsworldmarathi Pune: सुखसागरनगर येथील श्री अंबा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वस्थ नारी – सशक्त परिवार या सामाजिक उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आहे होते. या उपक्रमात परिसरातील अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य व सशक्तिकरणाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हे होते. महिलांसाठी आरोग्य तपासणी, मार्गदर्शन तसेच मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य याविषयी तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. सहभागी महिलांनी या उपक्रमातून आत्मविश्वास, आरोग्याची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी याबाबत सकारात्मक अनुभव घेतला.
ट्रस्टचे पदाधिकारी मगराज राठी यांनी सांगितले की, “महिला सशक्त झाल्या तर संपूर्ण कुटुंब आणि समाज मजबूत होतो. त्यामुळे आरोग्यदायी व जागरूक महिलांसाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाईल.” त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, भविष्यात अशा सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रमांची मालिका राबविली जाणार आहे.
या उपक्रमामुळे महिलांमध्ये एकतेची भावना वाढीस लागली असून आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करण्यास मोठी मदत झाली आहे. उपस्थित महिलांनी ट्रस्टचे आभार मानले व या उपक्रमामुळे त्यांना लाभदायक माहिती मिळाल्याचे सांगितले.
स्वस्थ नारी – सशक्त परिवार हा उपक्रम महिलांच्या आरोग्य, जागरूकता आणि सशक्तिकरणाचा एक आगळावेगळा प्रयत्न ठरला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Recent Comments