Newsworld marathi Pune : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी येथील एमआयटी आर्ट, डिझाईन, आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ व विद्यार्थी कल्याण विभागाच्या(एनएसएस) वतीने नुकतेच मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. मतदानाच्या या जनजागृतीसाठी विद्यापीठाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी पुणे रेल्वे स्थानक तसेच शहरातील विविध चौकांत हातात मतदानाचे आवाहन करणारे पोस्टर्स घेवून जनजागृती केली.विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला लोकांनीही उत्फुर्तपणे प्रतिसाद देत, आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सुट्टीचा आनंद न घेता आवर्जून मतदान करण्याचे वचन दिले. या उपक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.रजनिश कौर सचदेव यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्रा. विशाल पाटील व प्रा.अमन कांबळे यांच्या पुढाकाराने या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.