Newsworld marathi Pune : मुंबईवरून मूळगावी कोल्हापूरकडे जाणाऱ्या कारला पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने धडक दिल्याने कार मधील दोनजण गंभीर जखमी झाले आहे. अपघातात साडेतीन वर्षाची मुलीसह तिचे वडील किरकोळ जखमी झाले आहे. पुणे सातारा महामार्गावर चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी राजगड पोलिसांनी धाव घेतली असून परिस्थिती हाताळण्याचे काम सुरू आहे. सर्जेराव सखाराम पाटील वय ६०, ( पत्नी ) बायक्का सर्जेराव पाटील व ५०, ( मुलगा ) प्रवीण सखाराम पाटील वय ३५, ( नात ) इरा पाटील वय साडेतीन वर्ष (सर्व रा. दरेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी कारमध्ये जखमी असलेल्यांची नावे असून ही घटना पुणे – सातारा महामार्गावर देगाव फाटा ( ता. भोर ) येथे आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सर्जेराव पाटील व त्यांची पत्नी बायका पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.