Newsworldmarathi Pune: भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी राघवेंद्र मानकर यांची पुनर्निवड करण्यात आली. भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी घाटे यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत पुन्हा एकदा शहर कार्यकारिणीत मानकर यांना काम करण्याची संधी दिली. याबद्दल मानकर यांनी आभार व्यक्त केले.
मानकर यांनी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, पक्षाच्या ‘राष्ट्रप्रथम’ या विचारसरणीला केंद्रस्थानी ठेवून ते कार्य करणार. त्यांनी पुढेही पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी व कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधत कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, नामदार चंद्रकांत दादा पाटील, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार हेमंतभाऊ रासने, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे तसेच शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षकार्यास अधिक गती देण्याचे आश्वासन मानकर यांनी दिले.
त्यांच्या पुनर्निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पुणे शहर भाजपच्या संघटनात्मक कामकाजाला नवचैतन्य लाभेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


Recent Comments