Homeपुणेधनगर समाजाने विविध क्षेत्रातील प्रगतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे: कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांचे...

धनगर समाजाने विविध क्षेत्रातील प्रगतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे: कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांचे आवाहन

Newaworldmarathi Pune: धनगर समाजाने अधिवेशनातील विविध सत्रातील विविध विषयाची माहिती घेऊन त्या तज्ञ अनुभवी लोकांचे ऐकून विविध क्षेत्रात प्रगती करण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री मा. दत्तामामा भरणे यांनी पुणे येथील सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात व्यक्त केले.

तसेच आपला इतिहास समजून घेत होळकरांनी दिलेली शिकवण अंगीकारत विविध समाजाशी एकोप्याचे वातावरण निर्माण करायला हवे असे मत व्यक्त केले. धनगर समाजाने आता समाजाची सामाजिक व राजकीय ओळख निर्माण करायला हवी. आगामी काळात समाजातील तरुणांनी व्यवसाय व उद्योगाची वाट धरून स्वतःच्या उन्नतीचे मार्ग तयार केले पाहिजेत. धनगर समाजाचे सामाजिक संघटन देखील आगामी काळात निर्माण करून त्यामधून समाजाच्या उपेक्षित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

सकल धनगर समाजाच्या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात ॲड. प्रकाश आंबेडकर धनगर समाजाने आता ओबीसीचे नेतृत्व करावे असे मत मांडले. गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात आयोजित कार्यक्रमावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष विजय मोरे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार रामराव वडकुते, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते गणेश हाके, काँग्रेसचे नेते डॉ. यशपाल भिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन गावडे, महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, प्राप्तिकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, संयोजक ॲड. विजय गोफणे, सोमनाथ देवकाते, संतोष शिंदे, यशपाल रायभोगे, ज्ञानेश्वर नरुटे, गणेश सोनटक्के, गणेश दुगाने, धुळदेव टेळे, अनुजा जानकर, शंकर ढेबे, महादेव वाघमोडे, संतोष ढवळे, शालिनी शिंदे, ॲड. शिवाजी मदने, संतोष वरक, रमेश टकले, यशवंत गोवेकर, मनिषा दुगाणे, रसिका माने, प्रियंका सोनटक्के, अहिल्या गोफणे, स्वाती देवकाते, पूजा सोलनकर, स्वाती लवटे, अर्चना लाळगे, सुरेखा खरात, मनिषा मदने आदी उपस्थित होते.

यावेळी धनगर आरक्षणासाठी आजवर ज्यांनी उपोषण केले अशा उपोषणकर्त्या बांधवांचा गौरव कृषीमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये चंद्रकांत वाघमोडे, देवालाल मंडलिक, भगवान भोजने, जयप्रकाश हूलवाण, संतोष गोरड, महादेव नरवटे, रामराव कोल्हे यांच्या सह अनेक उपोषणकर्ते यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. विकास महात्मे म्हणाले, “धनगर समाज आरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी नेहमीच एकवटलेला आहे. त्यांचा हा अधिकार कोणीही हिरावून घेणार नाही. धनगर समाजाने शिक्षण, संघटन आणि हक्क यांची त्रिसूत्री अंगीकारली पाहिजे. समाजातील युवकांनी शिक्षणाच्या बळावर आपले स्थान निर्माण केले तर आरक्षण आणि आर्थिक उन्नतीचे प्रश्न सोडवणे अधिक सोपे होईल. समाजातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकसंघ व्हावे.”

प्रास्ताविकात ॲड. विजय गोफणे यांनी अधिवेशनाचे स्वरूप विशद केले. ‘आर्थिक सक्षमीकरण, उद्योगाच्या संधी व गरज, संस्थात्मक निर्मिती’, ‘सामाजिक सुधारणा, रूढी व परंपरा, विवाह पद्धती बदल, प्रबोधन व शैक्षणिक सुधारणा’, ‘समाज संघटन, संघटनात्मक संरचना, शाखा कार्यपद्धती, वार्षिक उपक्रम व नियोजन, केडर बांधणी’, ‘महिला सक्षमीकरण, चळवळीतला सहभाग, प्रबोधन व प्रशिक्षण, कुटुंब व्यवस्थापन आरोग्य, कायदे विषयक, प्रगतीच्या वाटा’, ‘नेतृत्व निर्मिती काळाची गरज राजकीय सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व अन्य स्वरूपाच्या नेतृत्वाचा विकास’, ‘धनगर एसटी आरक्षण: वर्तमान स्थिती, भविष्यातील लढ्याचे नियोजन, छत्तीसगड प्रकरणाचे वास्तव’, ‘माध्यमातील धनगर समाजाचे स्थान, अडथळे, संधी, माध्यम हाताळणी, व्यवस्थापन व भागीदारी’ आदी विषयांवर चर्चासत्रे झाली.

आभार श्री. यशपाल रायभोगे यांनी मानले.

अधिवेशनातील ठराव

१) धनगर ST आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी

२) महाराजा यशवंतराव होळकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून समाजाला आर्थिक सक्षमीकरण करण्यास सहकार्य करावे

३) आरक्षण आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत

४) मेंढपाळना एट्रोसिटी कायद्याचे कवच देऊन त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण द्यावे

५) जे आदिवासींना ते धनगराना अशी योजना २०१९ पासून सरकारने आणली व १००० कोटी प्रत्येक वर्षी देणार होते त्याची १०० % अंमलबजावणी करावी व अनुशेष भरून काढावा

याप्रमाणे ठराव घेण्यात आले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments