Newsworldmarathi pune: हेरिटेज इंटरनॅशनलच्या राष्ट्रीय संचालिका मृणाल सुमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची टीम आगामी “हेरिटेज इंटरनॅशनल ब्यूटी पेजंट” साठी जोरदार तयारी करत आहे. ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धा १ ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत थायलंडच्या बँकॉक येथे आयोजित केली जाणार आहे.
या स्पर्धेत भारतातून पाच प्रतिनिधी विविध श्रेणींमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामध्ये अवियाना मोरे (Kids Category), सौम्या नायर (Mrs Category), ज्योती मलार (Miss Category), दीपाली अमृतकर (Gold Category) आणि रुपाली ढेकेकर (Ms Category) यांचा समावेश आहे. हे पाचही स्पर्धक आपल्या सादरीकरणातून भारताचा समृद्ध इतिहास, विविधतेने नटलेली संस्कृती आणि वैभवशाली वारसा जगासमोर मांडणार आहेत.
ही स्पर्धा दरवर्षी *E Planet* या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित केली जाते. सुमारे ३५ देश या पेजंटमध्ये सहभागी होत असून, विविध देशांतील संस्कृतींचे संवर्धन, पर्यावरण संरक्षण, शांतता आणि एकात्मतेचा संदेश देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
टीम इंडियाच्या तयारीसाठी *मृणाल्स एंटरटेनमेंट*च्या संचालिका आणि *हेरिटेज पेजंटच्या नॅशनल डायरेक्टर* मृणाल सुमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण, वेशभूषा निवड आणि प्रस्तुतीचे नियोजन सुरू आहे. त्यांच्या सर्जनशील नेतृत्वामुळे टीम इंडियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारताच्या या प्रतिनिधी मंडळामुळे देशाच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा गौरव जागतिक स्तरावर झळकणार असून, बँकॉकमध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकताना दिसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Recent Comments