Newsworldmarathi Pune: श्री. पुणा गुजराती बंधू समाज आयोजित व निलकंठ ज्वेलर्स प्रस्तुत ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद देत तो मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेने प्रथमच या भव्य कार्यक्रमाचे आयोजन कोंढवा येथील संस्थेच्या नवनिर्मित अशा जयराज स्पोर्ट्स ॲण्ड कन्वेन्शन सेंटरच्या प्रशस्त ‘अनायास लॉन’वर केले होते.
पहाटेच्या मंगलमय वातावरणात सुप्रसिद्ध संगीत संयोजक संदिप पंचवटकर व त्यांच्या सहकारी वादक कलावंत आणि गायकांनी आपल्या सुरेल प्रस्तुतीने कार्यक्रमात रंगत आणली. सतारवादन आणि तबल्याच्या मनमोहक जुगलबंदीने या संगीत मैफलीची शानदार सुरुवात झाली.
यानंतर, संस्थेचे ट्रस्टी आणि देणगीदार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून दिपावलीच्या या मंगलमय पर्वाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे मॅनेजिंग संचालक राजेश शहा यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याबद्दल उपस्थित सर्वांचे विशेष करून जैन सोशल ग्रुप पुणे झोनचे झोन को-ऑर्डीनेटर सुजस शहा व सर्व सदस्यांना भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल विशेष धन्यवाद दिले.
संस्थेचे ट्रस्टी आणि दिवाळी पहाट कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक दिलीप मेहता यांच्या आभार प्रदर्शनाने या यशस्वी कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष वल्लभभाई पटेल, मॅनेजिंग सहसंचालक नैनेश नंदु, खजिनदार हरेश शहा, सेक्रेटरी राजेंद्र शहा, तसेच पदाधिकारी हेमंत मेहता, विनोद देढिया, मोहन गुजराती, जनक शहा, पंकज कपाडिया, दिपक मेहता, केतन कपाडिया, माधुरीबेन शहा, सत्येन पटेल, ब्रिजेन शहा, राजेश शहा यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम संस्थेच्या आजवरच्या यशस्वी उपक्रमांमध्ये एक मानाचा तुरा ठरला.
Recent Comments