Newsworldmarathi Pune: भारत विकास गृप (बीव्हीजी) व आम्ही पुणेकर संस्थेने जम्मू कश्मिर सिमेवरील बारामुल्ला, कुपवारा, दोडा, व रियासी येथिल भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
भारतीय जवान कुटूंबाला सोडून सिमेवर भारत मातेचे रक्षण करतात. सैनिकांच्या कर्तव्यदक्षतेमुळे भारतीय आपल्या कुटूंबासोबत सुरक्षीत दिवाळी साजरी करतात. सिमेवर तैनात असलेल्या जवानांना कुटूंबाची कमतरता भासू नये या उद्देशाने बीव्हीजी व आम्ही पुणेकर संस्थेने यंदाची दिवाळी जवानांसोबत साजरी करण्याचा संकल्प केला होता. दिपावली उत्सवासाठी सैनिकांचे कुटूंबीय उपस्थित होते.
जम्मू कश्मिर आपत्कालीन वैद्यकीय सेवा, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा बीव्हीजीच्या वतीने संचलीत केल्या जातात. ऑपरेशन सिंदुर दरम्यान जम्मू कश्मिर आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १०८ रुग्णवाहिकेने महत्वपुर्ण कामगिरी केली होती. रुग्णवाहिका सेवेचे प्रोजेक्ट हेड मुश्ताक अहमद यांच्या नियोजनाचे सैन्य अधिकाऱ्यांनी कौतुक केले.
दिपावली उत्सवाच्या निमित्ताने, बीव्हीजी कर्मचाऱ्यांनी तयार केलेले शुभेच्छा संदेश व भेटवस्तु जवानांना देण्यात आल्या. आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने दिवाळी फराळ, पुणेरी चिवडा, लाडू सैनिकांना देण्यात आला. यासाठी पुना मर्चंट चेंबरचे विशेष सहकार्य लाभले.
जम्मू कश्मिर येथिल काफीला फाऊंडेशन, जनरल जोरावर सिंग चॅरिटेबल ट्रस्ट यांनी दिपावाली उत्सवासाठी विशेष सहकार्य केले.
ऑपरेशन सिंदुर दरम्यान बीव्हीजीच्या वतीने संचालीत केली जाणाऱ्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या टीमने महत्वपुर्ण कामगिरी केली होती. आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या टीमने व माझ्या बीव्हीजीच्या सहकाऱ्यांनी यंदाची दिवाळी जवानांसोबत साजरी केल्याने मला मनस्वी आनंद होत आहे.
हणमंतराव गायकवाड
चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक बीव्हीजी
आम्ही पुणेकर नावाची स्वंयंसेवी संस्था गेली अनेक वर्षे सैनिकांसोबत विविध सन साजरे करत असते. सिमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी बीव्हीजी व आम्ही पुणेकर विविध उपक्रम राबवणार आहे.
हेमंत जाधव
अद्यक्ष आम्ही पुणेकर


Recent Comments