Newsworldmarathi Pune: भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशराज टिळेकर यांना मिळाली असून त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यशराज टिळेकर हे टिळेकर परिवारातील तिसऱ्या पिढीतील राजकीय कार्यकर्ते आहेत. त्यांच्या आजी श्रीमती रंजना (नानी) पुंडलिक टिळेकर या कोंढवा बुद्रुक परिसराच्या पहिल्या नगरसेविका होत्या. बालपणापासूनच त्यांनी टिळेकर परिवाराचा समाजसेवा व राजकीय प्रवास जवळून पाहिला आहे.
संघ शाखेत नियमित सहभाग, संघ शिबिरात हजेरी, कॉलेजमध्ये हेड बॉय म्हणून जबाबदारी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) कार्यकर्ता म्हणून काम, कोंढवा नगर सहमंत्री आणि पुणे शहर एकलव्य संयोजक अशी विविध पदे त्यांनी समर्थपणे सांभाळली आहेत.
गेल्या दोन वर्षांत विधानपरिषद सदस्य झाल्यानंतर त्यांनी भाजप संघटनेत सक्रिय काम सुरू केले आणि आता त्यांना युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे.
ही केवळ पदाची नव्हे, तर मोठ्या जबाबदारीची सुरुवात आहे. मला खात्री आहे की यशराज हे पदाच्या न्यायाने काम करतील, यशराज याने लहानपणापासून हातात घेतलेला भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन समाजसेवा करण्याची प्रतिज्ञा कायम ठेवली आहे.
योगेश टिळेकर
आमदार


Recent Comments