Newsworldmarathi Pune: पर्वती विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये तब्बल १ लाख २० हजार ५२४ दुबार नावे आढळल्याचा आरोप करत या नावांची तात्काळ वगळणी करण्याची मागणी पर्वती विधानसभा मतदारसंघातील अश्विनी नितीन कदम यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात राज्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या पत्रात कदम यांनी नमूद केले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाच्या अनुषंगाने पर्वती मतदारसंघात मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट नावे असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांची संपूर्ण यादी आयोगाला ईमेलद्वारे पाठवण्यात आली आहे.
कदम यांनी पुढे नमूद केले आहे की, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी या सर्व दुबार नावांची तपासणी करून त्यांची नावे तात्काळ वगळणी करण्यात यावी. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तातडीने निर्देश देऊन आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणामुळे पर्वती मतदारसंघातील मतदार याद्यांची विश्वसनीयता आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


Recent Comments