Homeभारतमध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात थंडीची लाट तीव्र; जळगाव ८.७ तर पुणे ११.२...

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात थंडीची लाट तीव्र; जळगाव ८.७ तर पुणे ११.२ अंश

Newsworldmarathi Pune: राज्यात हिवाळ्याचा जोर वाढत असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस या भागात कडक थंडीचा इशारा दिला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात तापमान घसरत असून नागरिकांना बोचऱ्या गारठ्याचा अनुभव येत आहे.

Advertisements

शनिवारी राज्यातील सर्वात कमी तापमान जळगाव येथे ८.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. पुण्यातील किमान तापमान ११.२ अंशांवर स्थिरावले. दिवसा थंडगार हवा आणि सायंकाळनंतर बोचरी थंडी या दुहेरी परिणामामुळे अनेक भागात शेकोट्यांचा आधार घेतला जात असून उबदार कपड्यांची खरेदीही वाढली आहे.

Advertisements

दरम्यान, कोकण पट्टा वगळता सर्वत्र थंडीचा कडाका कायम आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात लक्षणीय घसरण झाली असून अनेक भागात तापमान १० ते १२ अंशांच्या आसपास नोंदवले जात आहे. देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतही थंडीची लाट कायम आहे. राजस्थानमधील सिकर येथे सर्वात कमी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

शनिवारी दणक्यात गारठलेले जिल्हे
• जळगाव : ८.७°
• अहिल्यानगर : ९.६५°
• बीड : १०.५°
• गोंदिया : १०.६°
• यवतमाळ : १०.८°
• पुणे : ११.२°
• मालेगाव : ११.२°
• वाशिम : ११.६°
• परभणी : ११.७°
• अमरावती : १२.७°
• सातारा : १२°
• महाबळेश्वर : १२°
• छ. संभाजीनगर : १२.६°

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments