Homeपुणेआबा काँग्रेसचे, हेमंत बागुलांचा पक्ष ‘गुलदस्त्यात’! प्रभाग २७ मध्ये रंगली हेमंत बागुल...

आबा काँग्रेसचे, हेमंत बागुलांचा पक्ष ‘गुलदस्त्यात’! प्रभाग २७ मध्ये रंगली हेमंत बागुल यांच्या उमेदवारीची चर्चा?

Newsworldmarathi Pune:निवडणुकांचा हंगाम सुरू झाला की पुण्यातलं वातावरण तर आपोआपच तापतं. नगरपालिका–नगरपंचायतींच्या अर्जाची मुदत संपली, त्यात PMC च्या आरक्षण सोडतीनं तर पुणेकरांचं राजकारण आणखी पेटवलंय. कोण कुठून उभं राहणार, कोण कुणाला चॅलेंज देणार… प्रभागांत वाऱ्यापेक्षा वेगानं चर्चा सुरू आहेत.

Advertisements

अशात सगळ्याचं लक्ष वेधून घेतोय एकच नाव हेमंत बागुल यांनी. ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांचे सुपुत्र हेमंत बागुल यांची सध्या सोशल मीडियावर पोस्टर्सचं तुफान सुरू आहे. “हेमंत बागुल प्रभाग २७ नवी पेठ–पर्वती या प्रभागातून इच्छुक आहेत. हेमंत बागुल सध्या सोशल मिडियावर पोस्टरबाजी करताना दिसत आहेत. मात्र या पोस्टर वर कोणत्याही पक्षाचे चिन्ह नाही. हा प्रभाग म्हणजे भाजपचा जणू बालेकिल्ला. आता हेमंत बागुल यांचा अजून पक्ष निश्चित नाही त्यामुळे ते कोणत्या पक्षाकडून उभे राहणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.

Advertisements

आबा बागुल यांनी सहा टर्म काँग्रेसच्या नगरसेवक म्हणून धुमाकूळ घातला होता. नंतर अपक्ष लढले, त्यानंतर कोणत्याही पक्षात गेले नाहीत. पण अलीकडच्या नवरात्री महोत्सवाला चंद्रशेखर बावनकुळे आणि माधुरी मिसाळ हजर होते त्यामुळे हेमंत बागुल भाजप कडून लढणार का असेही चर्चा आहे.

“प्रभाग २७ मधल्या लोकांशी माझं नातं खूप जुने आहे. कोणत्या पक्षातून लढायचं, हे मित्र–कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच ठरवेन. पण निर्णय एकच — प्रभागाचा विकास!”

हेमंत बागुल

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments