Newaworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४१ मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी नारळ फोडून आपल्या प्रचाराची औपचारिक सुरुवात केली आहे. प्रचाराच्या प्रारंभीच कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
प्रभाग ४१ मध्ये सध्या शिवसेनेचा प्रचार जोरात सुरू असून, घरोघरी भेटी, नागरिकांशी थेट संवाद, तसेच परिसरातील प्रश्नांची माहिती घेत भानगिरे प्रचारात सक्रिय झाले आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि इतर नागरी सुविधांबाबत नागरिकांशी चर्चा करताना त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला आहे.
प्रचारादरम्यान नागरिकांकडून प्रमोद नाना भानगिरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. शिवसेनेच्या विचारधारेवर आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत नागरिकांनी भानगिरे यांना पाठिंबा दिला आहे. कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत प्रचारात जोमाने काम सुरू केले आहे.
प्रभाग ४१ मधील विकासकामांना गती देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे भानगिरे यांनी यावेळी सांगितले. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला. प्रचाराच्या सुरुवातीलाच मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रभाग ४१ मध्ये शिवसेनेचा प्रचार अधिक वेगाने वाढताना दिसत आहे.


Recent Comments