Homeभारतप्रभाग 38 मध्ये राणी भोसले यांचे उत्स्फूर्त स्वागत; महिलांचा भक्कम पाठिंबा

प्रभाग 38 मध्ये राणी भोसले यांचे उत्स्फूर्त स्वागत; महिलांचा भक्कम पाठिंबा

Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३८ मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवार राणी भोसले यांचे प्रभागात उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून राणी भोसले यांनी प्रभागातील नागरिकांशी संपर्क वाढवला असून, विविध ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत होत आहे. विशेषतः महिलांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे.

राणी भोसले यांनी नगरसेविका असताना प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने काम केले आहे. पायाभूत सुविधा, नागरी समस्या, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते तसेच दैनंदिन नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. विकासाबरोबरच पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले असून, विशेषतः महिला संघटन उभे करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

महिलांना संघटित करून त्यांना विविध सामाजिक, सांस्कृतिक व पक्षाच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचे काम राणी भोसले यांनी प्रामाणिकपणे केले आहे. याच कामाच्या जोरावर आणि आपुलकीच्या स्वभावामुळे आज प्रभागातील महिला मोठ्या संख्येने राणी ताईंच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहत आहेत.

राणी भोसले यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक ३८ मधील निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून, भाजपासाठी ही उमेदवारी महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments