Homeभारतएकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

Newaworldmarathi Pune: पक्षश्रेष्ठी चे पुन्हा आदेश मानत सतीश बहिरट यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पक्षा ची शिस्त राखन्यासाठी निष्ठावान कार्यकर्ता ची आवश्यकता आहे . जर पक्षा चे निष्ठावान चेहरेच संपून गेले तर पक्षा ची विचार धारा देखील संपून जाईल. आपण कष्टाने वाढवलेल्या पक्षा साठी या आधी उमेदवारी सोडली त्यात आजून एक ची भर अशी भावना बहिरट यांनी व्यक्त केली.

Advertisements

बहिरट यांनी २०१७ प्रमाणे २०२५- २०२६ मध्ये देखील अनेकांचे लक्ष वेधले. बहिरट यांची उमेदवारी हा प्रभागांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते असून त्यांची तळागाळातल्या पक्षाच्या मतदारांपर्यंत पोच आहे. पक्षाचा स्थानिक चेहरा म्हणून बहिरट यांची अनेक वर्षांपासून त्यांच्या भागामध्ये ओळख देखील आहे. जर बहिरट हे पक्ष विरोधात उभे राहिले असते तर त्याचा मोठा फटका हा पक्षाच्या मतदानाला बसत होता असे सर्वत्रिक कार्यकर्ते व मतदारांमध्ये चर्चा रंगली होती. पण आता या चर्चेला पूर्णवीराम लागलेला आहे.

Advertisements

पक्षनिष्ठा काय असते हे सतीश बहिरट यांनी पुन्हा दाखवून दिले. पक्ष त्यांना यंदाच्या वर्षी यथोगत सन्मान प्राप्त करून देईल अशी पूर्ण खात्री वरिष्ठांकडून सर्व कार्यकर्त्यांमध्ये देण्यात आलेली आहे. बहिरट यांच्या माघारी नंतर प्रभागामध्ये पुन्हा एकदा भाजपमय वातावरण प्रस्थापित झालेलं आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments