Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४० (क) मधील राजकीय हालचालींना वेग आला असून, कल्पना उदयसिंह मुळीक यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभागाच्या सर्वसमावेशक विकासाचा ध्यास घेऊन त्या जनतेसमोर उभ्या राहिल्या असून, त्यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे.
हा प्रचार शुभारंभ कार्यक्रम कोंढवा बुद्रुक येथील श्री साई दत्त मंदिर, उदयसिंह मुळीक सांस्कृतिक भवन समोर, साईनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सौ. कल्पना मुळीक या प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधणार असून, विकासाची दिशा, प्राधान्यक्रम आणि भविष्यातील आराखडा मांडणार आहेत.
प्रभाग क्रमांक ४० (क) मध्ये येणाऱ्या कोंढवा बुद्रुक व येवलेवाडी परिसरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच महिला व युवकांच्या प्रश्नांकडे लक्ष देत सर्वांगीण विकास साधण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून पारदर्शक व लोकाभिमुख कारभार राबवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास प्रभाग क्रमांक ४० (क) कोंढवा बुद्रुक व येवलेवाडी येथील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कल्पना उदयसिंह मुळीक यांनी केले आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि पाठिंबा मिळाल्यास प्रभागाच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


Recent Comments