Homeभारततुमच्या प्रामाणिक कार्याची पक्ष नक्कीच दखल घेईल; वरिष्ठांकडून श्रीकांत जगताप यांचे...

तुमच्या प्रामाणिक कार्याची पक्ष नक्कीच दखल घेईल; वरिष्ठांकडून श्रीकांत जगताप यांचे कौतुक

Newsworldmarathi Pune: पुणे शहराच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय रचणारे प्रभाग क्रमांक ३५ चे पहिले नगरसेवक श्रीकांत जगताप यांचा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे व व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे शहरात पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून येत इतिहास घडवणाऱ्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला.

यावेळी बोलताना प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी श्रीकांत जगताप यांच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले की, “तुम्ही आजपर्यंत प्रभागातील नागरिकांसाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रामाणिक काम, लोकांशी ठेवलेला थेट संवाद आणि सातत्यपूर्ण सेवा यामुळेच आज हे यश तुम्हाला मिळाले आहे. भविष्यात पक्ष तुमच्या कामाची नक्कीच दखल घेईल आणि तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच श्रीकांत जगताप हे युवकांसाठी प्रेरणादायी नेतृत्व ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना श्रीकांत जगताप यांनी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. “मी २४ तास प्रभागातील नागरिकांसाठी उपलब्ध राहीन. प्रभागातील मूलभूत सुविधा, विकासकामे, नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट राहील,” असे त्यांनी सांगितले. पुढील काळात प्रभागाच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments