Newsworldmarathi Pune: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य प्रचार शुभारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत हा प्रचार दौरा पार पडणार असून, प्रभागातील विविध भागांतून प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. या प्रचाराच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पक्षाची ध्येये, विकासाची भूमिका आणि उमेदवारांचे काम पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या प्रभागातून अधिकृत उमेदवार म्हणून विराज विश्वनाथ लांडे (ओबीसी पुरुष), अनुराधा सुशील लांडगे (सर्वसाधारण महिला), अश्विनी नितेश फुगे (सर्वसाधारण महिला) आणि अमोल मधुकर डोळस (सर्वसाधारण पुरुष) निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांनी आतापर्यंत प्रभागात सामाजिक, शैक्षणिक व नागरी विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेत नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे.
प्रचार मार्गात छत्रपती शिवाजी महाराज चौक, विविध मंदिरे, चौक, वसाहती आणि प्रमुख रस्त्यांचा समावेश असून ठिकठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर मतदान करून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.


Recent Comments